ई-वॉलेट म्हणजे काय ?

 


ई-वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. इलेक्ट्रॉनिक कार्डाचा तो एक प्रकार असून संगणक किंवा स्मार्टफोनने ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ते वापरले जाते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डासारखीच ई-वॉलेटचीही उपयोगिता आहे. ई-वॉलेट बँक खातेधारकाच्या खात्याशी जोडावे लागते आणि त्यानंतर खात्यावरून पैसे चुकते करता येतात. ई-वॉलेटचा प्रमुख हेतू हा कागदाशिवाय पैशांचे व्यवहार सोपा करणे हा आहे.

ई-वॉलेटचे घटक

 

याचे कार्य कसे चालते ?

सॉफ्टवेअर आणि माहिती हे ई-वॉलेटचे महत्त्वाचे दोन घटक आहेत.

सॉफ्टवेअर हा घटक व्यक्तिगत माहिती साठवून ठेवतो आणि संकलित माहिती सुरक्षित राखतो. तर माहिती हा घटक वापर करणाऱ्याने पुरवलेल्या तपशिलांचा एक डाटाबेस असतो  उदा. नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, पैसे अदा करण्याची पद्धत, रक्कम, क्रेडिट/डेबिट कार्डाचा सविस्तर तपशील आदी.

ई-वॉलेट कसे वापरावे?

ग्राहकांसाठी
 • आपल्या मोबाइल उपकरणावर अॅप एन्क्रिप्शन डाऊनलोड करा.
 • योग्य माहिती भरून साइनअप करा. वापरकर्त्याला पासवर्ड मिळेल.
 • क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून किंवा नेटबँकिंगने पैसे टाका.
 • ऑनलाइन खरेदी केली तर ई-वॉलेट खरेदीदाराची माहिती पैसे अदा करण्यासंबंधीच्या तपशिलात आपोआप सादर करते.
 • ऑनलाइन पैसे दिले की ऑर्डर फॉर्म भरण्याची गरज नाही. अन्य वेबसाइटलाही माहिती पुन्हा देण्याची गरज राहात नाही कारण ती एकदा पुरवल्यावर साठवलेली राहाते तसेच नव्याने केलेल्या दुरुस्त्याही आपोआप नोंदवल्या जात राहातात.
व्यापाऱ्यांसाठी
 • व्यापारी आपल्या उपकरणावर  अॅप डाऊनलोड करतात.
 • संबंधित माहिती भरून साइन-अप करतात. उपभोक्त्यास पासवर्ड मिळतो.
 • आपण व्यापारी असल्याचे स्वत:ला घोषित करावे लागते.
 • ग्राहकांकडून आलेले पैसे स्वीकारण्यास सुरुवात करा.
ई-वॉलेट सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे ?
 1. बँकेत खाते
 2. स्मार्ट फोन
 3. 2G/3G/4G कनेक्शन
 4. मोफत वॉलेट अॅप

डिजिटल आर्थिक सेवांचा वापर करताना अवश्य करायलाच हवे असे काही
 • खाते असलेल्या बँकेमध्ये आपला मोबाइल क्रमांक नोंदवा. त्यामुळे आपला प्रत्येक व्यवहार होताना बँक एसएमएसद्वारे आपल्याला त्याची सूचना देऊ शकेल.
 • आपला पिन (PIN) दुसऱ्या कोणालाही सांगू नका.
 • विश्वसनीय अशा संस्थांशीच व्यवहार करा.
 • एटीएममध्ये असताना आपल्या खांद्यावरून कोणी आपला व्यवहार पाहात नाही ना, याची खात्री करा. 
ई-वॉलेट म्हणजे काय ? 4.5 5 मराठी चावडी ई-वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. इलेक्ट्रॉनिक कार्डाचा तो एक प्रकार असून संगणक किंवा स्मार्टफोनने ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा